34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयपतीसोबत राहण्यासाठी पत्नीवर बळजबरी चुकीची - सर्वोच्च न्यायालय

पतीसोबत राहण्यासाठी पत्नीवर बळजबरी चुकीची – सर्वोच्च न्यायालय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशामध्ये पत्नी ही काही मालमत्ता किंवा वस्तू नसल्याचे म्हटले आहे. पतीसोबत राहण्याची तिची इच्छा नसेल तर त्यासाठी पती तिच्यावर दबावा टाकू शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी दिला. न्या. संजय कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. तुम्हाला काय वाटते?, पत्नी एखादी वस्तू आहे का? आणि तिने काहीही न बोलता तुमच्याबरोबर रहायला जावे, असा आदेश आम्ही द्यावा काय?असा खडा सवालच त्यांनी याचिकाकर्त्याला केला.

गोरखपुरमधील एका जोडप्यात पतीकडून वारंवार हुंड्याची मागणी होत असल्याने पत्नी विभक्त झाली होती. काही वर्षांनंतर तिने स्थानिक कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी याचिका केली होती. न्यायालयाने तिच्याबाजूने निकाल दिला होता. निकालाविरोधात पतीने प्रथम उच्चन्यायालयात दाद मागितली. मात्र न्यायालयाने त्याला दिलासा दिला नाही.तसेच पत्नीला दरमहा २० हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश दिला. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.

आपली बाजू मांडताना या महिलेने आपले वकील अनुपम मिश्रा यांच्या माध्यमातून न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार पोटगीची रक्कम द्यायला लागू नये म्हणून पतीचे हे सर्व प्रयत्न सुरु असल्याचा दावा केला. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान पतीच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाने या महिलेला पतीसोबत परत जाण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने संविधानातील अधिकारांच्या संरक्षणाचा पतीच्या याचिकेमधील मुद्दा फेटाळून लावला. उच्चन्यायालयाने पोटगीसंदर्भातील आदेश दिल्यानंतर ही याचिका दाखल केल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

वकीलालाही स्पष्ट शब्दात तंबी
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पतीच्या वकीलाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली. ते महिलेसोबत एखादी संपत्ती असल्याप्रमाणे वागत आहेत. ती काही वस्तू नाही, असे सांगत तुम्ही इतके बेजबाबदार कसे असू शकता? अशी तंबीच त्या वकीलाला दिली. तसेच यासंदर्भात आम्ही आदेश देण्याचा काही प्रश्नच येत नाही असेही सुनावले.

५६ लाख रुपयांना विकले गेले एक तोळे सोन्याचे नाणे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या