25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयपरदेशी मालमत्ता जाहीर न केल्यास दंड

परदेशी मालमत्ता जाहीर न केल्यास दंड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात कर नियामकांनी परदेशात अनेक कर करार केले आहेत. त्यामुळे देशातील कर नियामकांना देशातील नागरिकांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीची माहिती मिळते. जर तुम्ही तुमच्या प्राप्तिकर रिटर्नमध्ये परदेशात संपत्ती घोषित केली नसेल, तर तुम्हाला ब्लॅक मनी अ‍ॅक्ट अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत दंड बसू शकतो. तसेच ते अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता म्हणून गणले जाण्याचा धोका आहे. त्यातून ३० टक्के कर आणि एकूण कर दायित्वाच्या ३ पट दंड आकारला जाऊ शकतो.

काळा पैसा आणि अघोषित उत्पन्न ही देशामध्ये ब-याच काळापासून मोठी समस्या आहे. गेल्या अनेक दशकांपासून सरकारी कर अधिकारी वेळोवेळी नागरिकांकडून परदेशात जमा केलेल्या उत्पन्नाचा खुलासा करत आहेत. यावरून आजही मोठ्या प्रमाणात लोक परदेशात गुंतवणूक करत असल्याचे दिसून येते. काळा पैसा आणि अघोषित उत्पन्न हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका आहे. आता ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने २०१५ मध्ये अज्ञात परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता (कर लादणे) विधेयक, २०१५ सादर केले आहे. त्यानंतर ते देशातील सर्व नागरिकांसाठी अनिवार्य आहे.

त्यानुसार जर त्याच्याकडे परदेशात कोणतीही मालमत्ता असेल किंवा परदेशातून कोणतेही उत्पन्न येत असेल तर त्याला प्राप्तिकर रिटर्नमध्ये घोषित करणे भाग आहे. आयकर विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करदात्यांना शेड्यूल एफए अंतर्गत परदेशी खाती, परदेशी कंपन्यांचे शेअर्स, विदेशी निधीचे म्युच्युअल फंड युनिट्स आणि स्थावर मालमत्ता घोषित करावी लागतील. तसेच करदात्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की परदेशात मालमत्ता असली आणि त्यातून कोणतेही उत्पन्न मिळत नसेल तरीही ते आयटीआरमध्ये उघड करावे लागेल.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या