लंडन: भारत सरकारच्या नव्या कृषि कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन तीव्र झाले आहे. आंदोलनाला ब्रिटन, कॅनडासह इतर देशातील खासदारांनीही पाठिंबा दिला आहे. ब्रिटनचे मजूर पक्षाचे खासदार तनमनजीत सिंग यांनी आंदोलनाला ट्विटद्वारे पाठिंबा दिला. मजूर पक्षाचे खासदार जॉन मॅकडोनल यांनीदेखील तनमनजीत सिंग यांना पाठिंबा देत शेतक-यावर दडपशाही चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
खासदार प्रीत कौल यांनीदेखील आंदोलनाची दृष्ये पाहिल्यानंतर मन हेलावून गेले असल्याचे म्हटले आहे. कॅनडातील न्यू डेमोक्रॅटीक पक्षाचे प्रमुख जगमीत सिंग यांनी ट्विट करून पाठिंबा व्यक्त केला आहे. कॅनडातील ऑटारियोतील विरोधी पक्ष नेत्या अॅण्ड्र हॉरवात यांनी देखील ट्विट करून पाठिंबा दर्शविला आहे. दोन दिवसांपुर्वी कॅनडाच्या पंतप्रधानांनीदेखील भारतातील आंदोलनामुळे चिंता वाटत असल्याचे म्हटले होते.