27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयमाजी मुख्यमंत्री येदियुरप्पांना धक्का

माजी मुख्यमंत्री येदियुरप्पांना धक्का

एकमत ऑनलाईन

बंगळुरु : सध्या विविध ठिकाणी निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. कर्नाटकातही विधान परिषदेच्या ७ जागांसाठी निवडणुका होत आहे. त्यामुळे सध्या कर्नाटकात ३ जून रोजी होणा-या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपकडून आज मंगळवारी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. यात माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे पुत्र व भाजपचे उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना तिकीट नाकारण्यात आले. यामुळे हा येदियुरप्पांना मोठा धक्का मानला जात आहे. कर्नाटकात विधान परिषदेच्या ७ जागांसाठी ३ जूनला निवडणूक होत आहे. यात ४ जागांवर भाजपचा विजय निश्चित आहे. मात्र, येदियुरप्पांच्याच पुत्राला तिकीट नाकारले गेले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या