27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयगोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार लुइजिन्हो फलेरो यांनी आमदारकीचा राजीनामा सुपुर्द केला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले की, मी नावेलिममध्ये माझ्या समर्थकांशी चर्चा केली. ते माझे कुटुंब आहेत आणि माझी नवी सुरुवात करण्याआधी त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा होता. माझे वय झाले असले तरी रक्त अजुनही तरुण आहे. गोव्याला त्रासातून मुक्त करूया आणि गोव्यात नवीन सकाळ आणूया असे आवाहनही त्यांनी ट्विटरवरून केले आहे.

फलेरो यांनी म्हटले की, माझ्यावर नावेलिमच्या लोकांनी विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. भविष्यातही ते मला असाच पाठिंबा देतील, असा विश्वासही राजीनामा दिल्यानंतर त्यांनी व्यक्त केला आहे. लुइजिन्हो यांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मतभेद होते. त्यामुळेच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, तृणमूल काँग्रेस आणि लुइजिन्हो फलेरो यांच्यामध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते. त्यामुळे लुइजिन्हो फलेरो हे तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोवा निवडणूक रंगणार
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी भवानीपूर इथे प्रचारावेळी गोव्यात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. तसेच, गोव्यात तृणमूल काँग्रेस उतरण्याची तयारी करत असल्याचे सांगितले होते. नुकतेच तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन आणि प्रसून बॅनर्जी यांच्या टीमने गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचा दौरा केला होता. राज्यात पक्षाला पोषक वातावरण तयार करण्यासाठी रणनिती आखण्याच्या निमित्ताने प्रशांत किशोर यांच्या आयपीएसचे मेंबरसुद्धा गोव्यात आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या