24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयगुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाणारे केशुभाई पटेल यांचे गुरुवारी हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते.

केशुभाई पटेल यांनी दोन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भुषवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते. जनसंघाच्या संस्थापक सदस्यांमध्येही त्यांचा समावेश होतो. दोन वेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र राजकारणामुळे तख्तपालट होऊन दोन्ही वेळेला आपला कार्यकाळ त्यांना पूर्ण करता आला नाही. २००१ साली त्यांच्याऐवजी नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

देशभरात ९१ % रुग्णांनी कोरोनावर केलेली मात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या