22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयकेरळच्या माजी आरोग्यमंत्री शैलजा यांनी मॅगसेसे पुरस्कार नाकारला

केरळच्या माजी आरोग्यमंत्री शैलजा यांनी मॅगसेसे पुरस्कार नाकारला

एकमत ऑनलाईन

तिरुअनंतपुरम : केरळच्या माजी आरोग्य मंत्री केके शैलजा कोरोना काळात देशभरात चर्चेत आल्या होत्या. केरळ एकाचवेळी कोरोना आणि निपाह संसर्गाशी लढा देत होता. मात्र आरोग्यमंत्री म्हणून शैलजा यांनी उत्तम काम करत केरळमधील संसर्ग नियंत्रणात आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. या कामगिरीबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा ६४ वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर होणार होता. मात्र त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या के के शैलजा यांनी सांगितले की, नोबेल पुरस्काराची आशियाई आवृत्ती मानला जाणारा मॅगसेसे पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय पक्षाशी चर्चा केल्यानंतर घेतला आहे. मला पुरस्कार समितीने कळवले की पुरस्कारासाठी माझा विचार केला जात आहे. पण मी एक राजकीय नेता आहे. हा पुरस्कार सहसा राजकीय नेत्यांना दिला जात नाही असेही शैलजा म्हणाल्या. मी पक्षाच्या केंद्रीय समितीची सदस्य आहे. मी माझ्या पक्षनेतृत्वाशी यावर चर्चा केली आणि आम्ही एकत्रितपणे हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हा एक मोठा पुरस्कार आहे. पण पुरस्कार देणारी एनजीओ असून ही एनजीओ कम्युनिस्टांच्या तत्त्वांचे समर्थन करत नसल्याचंही शैलजा यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या