17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयमाजी मंत्री राजेंद्र पाल यांची पोलिस चौकशी होणार

माजी मंत्री राजेंद्र पाल यांची पोलिस चौकशी होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र पाल गौतम यांची आता पोलिस चौकशी होणार आहे. कथित धर्मांतर प्रकरणात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पोलिस चौकशीला समोरे जावे लागत आहे.
दिल्ली सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्यावर हिंदूूू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी भाजपने त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते.

गौतम हे एका कथित धर्मांतर कार्यक्रमात सहभागी झाल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने गौतम यांच्यावर हल्लाबोल केला होता. पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी राजेंद्र पाल गौतम यांच्यावर आरोप केला होता की, ऑक्टोबर २०२५ पर्यंत १० कोटी हिंदूंना बौद्ध अनुयायी बनवण्याचे लक्ष्य आपने ठेवले आहे. त्यानंतर दिल्ली सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच दिला.

आता राजेंद्र पाल गौतम यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांना धर्मांतर प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती सोबत ठेवण्यास सांगितले आहे. यासंबंधी सोमवारी माध्यमांनी विचारले असता, आपल्याला कोणत्याही चौकशीसाठी बोलावले नसल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु पोलिसांकडून त्यांना बोलावल्याचे आज स्पष्ट झालेले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या