21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयमुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे ईडीच्या कार्यालयात दाखल

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे ईडीच्या कार्यालयात दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दोन दिवसांपूर्वी अंमजलबाजवणी संचालनालयाने अर्थात ईडीने नोटीस पाठवली होती. या नोटीशीनुसार संजय पांडे ईडीच्या दिल्ली येथील कार्यालयात पोहोचले आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज संबंधी कथीत घोटाळा प्रकरणी त्यांना ईडीने चौकशीला बोलावले होते.

संजय पांडे निवृत्त होऊन तीन दिवस झाले होते तेव्हा त्यांनी ईडीने नोटीस पाठवली. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ते विश्वासून असल्याने आणि ठाकरेंचे सरकार कोसळल्यानं पांडे यांच्या नोटीशीमुळे चर्चांना उधाण आले होते. दोन वेगवेगळ्या प्रकरणात त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज सर्व्हरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोप मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केल्याप्रकरणाचा समावेश होता.

ईडीने आपल्या नोटिशीत संजय पांडे यांना ५ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता दिल्ली येथील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, संजय पांडे आज ईडीसमोर हजर झाले आहेत. आता किती तास त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होते हे पहावे लागेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या