26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयमाजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली असून दोन वेगवेगळ्या प्रकरणात संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ईडीने त्यांना मंगळवार दि. १९ जुलै रोजी दिल्लीमध्ये अटक केली आहे. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

संजय पांडे ३० जून रोजी मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलिस आयुक्त आहेत.

संजय पांडे ज्यावेळी राज्याचे पोलिस महासंचालक होते तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच सर्व्हर कॉप्रमाईज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या प्रकरणात बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या