24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home राष्ट्रीय माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय इतमामात लोधी स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी मुखाग्नी दिला.

प्रणव मुखर्जी यांचे पार्थिव आज सकाळी 9.30 दरम्यान राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान गाईडलाईन्स पालन केले गेले.यावेळी त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी तसेच इतर कुटुंबियांनी पीपीई किट घातला होता. दुपारी 2 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले.

84 वर्षीय असलेले प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले होते. दीर्घ काळ राजकारणात सक्रिय असलेले काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना 10 ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ब्रेन सर्जरी नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती आणि त्यांची कोरोना चाचणी केली असता ते कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.

शाळेनं फीचा तगादा लावल्याने 10 वीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

प्रणव मुखर्जी 2012 ते 2017 या कालावधीत भारताचे राष्ट्रपती होते. त्यांना 2019 मध्ये भारतरत्न आणि 2008 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. सोबतच पश्चिम बंगाल सरकारने देखील दुखवटा जाहीर केला आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, सिडीएस बिपीन रावत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंदीय मंत्री हर्षवर्धन, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरूर, अधीर रंजन चौधरी, सिपीआय महासचिव डी राजा, अरविंद केजरीवाल अशा अनेकांनी दिवंगत राष्ट्रपतींना श्रद्धांजली अर्पण केली.

परभणीतील जिल्हा रुग्णालयातून तीन कोरोनाबाधित कैदी ‘रफूचक्कर’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या