24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home राष्ट्रीय माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात, प्रकृती आणखीच खालावली

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात, प्रकृती आणखीच खालावली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती आणखी खालावली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक असून मुखर्जी हे आता कोमात गेल्याची माहिती आहे. प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यातच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने प्रकृती आणखीच खालावली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचं खास पथक त्यांच्यावर उपचार करत असून उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांची चिंता वाढली आहे.

दरम्यान आज सकाळपासूनच प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर उलट सुलट बातम्या येत आहेत. 84 वर्षांचे मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांची खास टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मात्र कोविड आणि मेंदूच्या गाठीमुळे डॉक्टरांची काळजी वाढली आहे. राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

किराणा सोबत कोरोना घेऊन घरी येऊ नका-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या