32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयमाजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन

माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन

एकमत ऑनलाईन

माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. देशाचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी देखील जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे जसवंत सिंह यांनी देशाची कायम सेवा केली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणजे राजनाथ सिंह आपल्या ट्विटमध्ये
जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार व समर्थकांच्या बरोबर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट

“जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत मोदींनी ट्वटिमध्ये म्हटले की, जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.”

राहत्या घरी पाय घसरुन पडले होते

जसवंत सिंग गेल्या सहा वर्षांपासून कोमामध्ये होते. ते 8 ऑगस्ट 2014 रोजी आपल्या राहत्या घरी पाय घसरुन पडले होते. उपचारादरम्यान ते कोमामध्ये गेले. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. ते कधी कधी डोळे उघडायचे, थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करायचे, असे त्यांचे सुपुत्र मानवेंद्र सिंग यांनी सांगितले होते.

संरक्षण विषयातील तज्ज्ञही होते  जसवंत सिंग

अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंग यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून काम केले होते. ते संरक्षण विषयातील तज्ज्ञही होते. ते भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

नाराज होऊन भाजपला रामराम केला होता

जसवंत सिंग यांनी 2014 मधील लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन भाजपला रामराम केला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि त्यानंतर राजकारणात प्रदीर्घ कार्यकाळात

‘जसवंत सिंग यांनी संपूर्ण देशाची मन लावून सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि त्यानंतर राजकारणात प्रदीर्घ कार्यकाळात. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले. अर्थ, रक्षा आणि परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली.

लोहा व कंधार तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतीच्या पंचनामे करून मदत करून नुकसानभरपाई द्यावी – खासदार प्रताप पाटील चिखलीकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या