22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयभिंत कोसळून चौघांचा मृत्यू

भिंत कोसळून चौघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नोएडा : नोएडाच्या सेक्टर २१ मध्ये बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत भिंतीखाली काही लोक अडकल्याचीदेखील भीती व्यक्त केली जात असून घटनास्थळी मदत आणि बचवकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जल वायू विहारमध्ये पॉवर हाऊससमोर ही भिंत पडली असून जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती डीएम सुहास एलवाय यांनी दिली आहे.

सीमाभिंतीच्या नाल्याच्या दुरुस्तीदरम्यान सीमांिभत सुमारे २०० मीटर खाली पडल्याने हा अपघात झाला आहे. घटनेवेळी या ठिकाणी एकूण १२ मजूर काम करत होते. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. भिंतीलगत नाली बनवण्याचे काम सुरू असताना अचानक भिंत पडल्याने हा अपघात झाला. सध्या ३ जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा बाजूल करण्याचे काम सुरू असून ढिगा-याखाली कुणी अडकले आहेत का? याचा शोध सुरू आहे.

नोएडाचे डीएम सुहास एलवाय यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, नोएडा सेक्टर २१ मधील जलवायू विहारजवळ ड्रेनेज दुरुस्तीच्या कामाचे कंत्राट दिले होते. यावेळी मजूर विटा काढत असताना भिंत कोसळून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात दोन आणि कैलास रुग्णालयात दोन अशा एकूण ४ मृत्यूची नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या