29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ल्यात चार जवान जखमी

दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ल्यात चार जवान जखमी

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. याच दरम्यान जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी सैन्याच्या एका टीमवर ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या परिसरात सर्च आॅपरेशन सुरू करण्यात आले आहे.

कुलगाम जिल्ह्यातील खानबलच्या शमशीपोरा बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सॅनिटेशन ड्रिलदरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली आहे. ग्रेनेड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भूजबळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या