26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयदेशात वर्षअखेरीस चार लसी होणार उपलब्ध

देशात वर्षअखेरीस चार लसी होणार उपलब्ध

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात सध्या दुसरी लाट आटोक्यात आली असली तरिही धोका मात्र, कायम आहे. त्यातच भारतामध्ये लसीचा तुटवडा पडला आहे. देशात सर्वांसाठी लस उपलब्ध होण्यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे. सध्या कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तीन लसी भारतामध्ये उपलब्ध आहेत. पुढील काही दिवसांमध्ये भारतात आणखी काही लसी उपलब्ध होणार आहेत. २०२१ या वर्षाअखेरीपर्यंत आणखी सात लसी भारतात येण्याची शक्यता आहे. या लसी भारतात उपलब्ध झाल्यानंतर लसीचांचा तुटवडा संपेल. तसेच लसींच्याकिंमतीमध्येही मोठी घट होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूूट ऑफ इंडिया (एसआयआय) सध्या कोव्हिशील्ड लसीची निर्मिती करत आहे. देशातील ९० टक्केंचे लसीकरण याच लसीने झाले आहे. सीरम सध्या प्रोटीनयुक्त लसीची निर्मिती करत आहे. ही लस कोव्हॅक्स या नावाने भारतात येणार आहे. कोव्हॅक्सचे उत्पादन सुरु झाले आहे. पुढील काही महिन्यात ही लस भारतामध्ये वापरली जाईल. डिसेंबर २०२१ पर्यंत ही लस नागरिकांसाठी उपलब्ध होईल.

एचजीसी ०१९
पुण्यातील जीनोव्हा बायोफार्मासिटीकल कंपनीने पहिल्या एमआरएनए कोरोना लसीची निर्मिती केली आहे. याला एचजीसी ०१९ असे नाव देम्यात आले आहे. गेल्या महिन्यात याची क्लिनिकल चाचणी सुरु झाली आहे. फेज एक ला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. १२० जणांवर क्लिनिकल चाचणी करण्यात आली आहे. डिसेंबर २०२१ अथवा जानेवारी २०२२ पर्यंत ही लस सर्वांसाठी उपलब्ध होईल.

नेझल व्हॅक्सिन
भारत बायोटेकची नेझल व्हॅक्सिनचे सध्या क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. नाकावाटे दिली जाणारी ही पहिलीच लस आहे. या लसीचे नाव बीबीव्ही १५४ असे ठेवण्यात आले आहे. सध्या या लसीचे पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु झाले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन सध्या उपलब्ध आहे.

झेडवायकोव्हडी
गुजरातमधील झायडस कॅडिला या कंपनीने कोरोना लस तयार केली आहे. या लसीचे नाव झेडवायकोव्हडी असे आहे. ही डीएनए व्हॅक्सिन असल्याचे बोलले जात आहे. सद्या ही लस प्राथमिक चाचणीमध्ये अडकली आहे. पण वर्षाअखेरपर्यंत ही लस सर्वांसाठी उपलब्ध होईल, असेही सांगितले जात आहे.

पहिला डोस देण्यात भारत अमेरिकेच्या पुढे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या