24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयबिहारच्या जनतेला मोफत कोरोना लस

बिहारच्या जनतेला मोफत कोरोना लस

बिहार विधानसभा निवडणूक; भाजपचा जाहीरनामा जाहीर; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याहस्ते प्रसिध्द

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि़ २२ ऑक्टोबर रोजी भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला कोरोनाचा मोफत लस देण्यात येईल, असे आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. बिहार निवडणुकीसाठी भाजपाने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी कोरोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना कोरोनाचा लस मोफत दिली जाईल, असे जाहीरमान्यात म्हटले आहे.

तामिळनाडूतही मोफत कोरोना लस
तामिळनाडू सरकारने तेथील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्याची निर्णय घेतला असल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पडी पलानीस्वामी यांनी केली आहे.

धनगर समाजाचे काळेश्वर येथे अर्धजल समाधी आंदोलन

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या