22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयदिवाळीपर्यंत मिळणार मोफत अन्नधान्य

दिवाळीपर्यंत मिळणार मोफत अन्नधान्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्याची योजना राबविली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केली होती. या योजनेवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवार दि़ २३ जून रोजी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पुढील नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत अन्नधान्य देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. फक्त अन्नधान्य वाटपाच्या योजनेचा देशभरातील ८१ कोटी ३५ लाख नागरिकांना लाभ होणार आहे. दरमहा प्रती व्यक्ती ५ किलो धान्य योजनेअंतर्गत दिले जाईल. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेसाठी पात्र असलेल्या लोकांना योजनेनुसार पुढील पाच महिने मोफत धान्य मिळणार आहे. योजना राबविण्यासाठी ६७ हजार २६६ कोटी रुपयांचा खर्च येणार असून तेवढा भार सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे.

सेंट्रल वेअरहाऊसिंग विलीनीकरणचा निर्णय
सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊसिंग कंपनीचे (सीआरडब्ल्यूसी) सेंट्रल वेअरहाऊसिंग कंपनीत (सीडब्ल्यूसी) विलीनीकरण करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. दोन्ही कंपन्या एकाच प्रकारच्या कामात म्हणजे वेअरहाऊसिंग, हँडलिंग आणि वाहतूक कामात व्यस्त आहेत. त्यामुळे हे विलीनीकरण करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

सलग दुसऱ्या वर्षीही आषाढी वारी दरम्यान विठुरायाच्या दर्शनापासून पहावे लागणार वंचित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या