26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीय१८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण मोफत; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

१८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण मोफत; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्त्वाची घोषणा केली. देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोविड योद्धे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. तर राज्यांनी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. मात्र, आता १८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाºया लसींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, जगात लसीची मागणी होत आहे. लसींच्या मागणीशी तुलना केली, तर जगात करोना लसीचं उत्पादन आणि पुरवठा करणाºया कंपन्या खूप कमी आहेत. मग अशा परिस्थिती जर आज भारतात लसींचे उत्पादन झाले नसते, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती. मागचा इतिहास बघितला, तर लक्षात येते की, भारताला दशकं लागायची. पोलिओसह अनेक लसींसाठी देशवासियांना वाट बघावी लागली. पण, २०१४ मध्ये भारतात लसीकरणाचा वेग ६० टक्केच होता. उत्पादनाचे प्रमाण खूप कमी होते. हे आमच्यासाठी खूप चिंतेची गोष्ट होती. त्याच वेगाने जर लसीकरण झाले असते, देशाला ४० वर्ष लागले असते. पण, यासाठी सरकारने मिशन इंद्रधनुष्य सुरू केले. लस तयार केली जाईल आणि ज्याला गरज आहे. त्याला दिली जाईल, केवळ सहा वर्षात लसीकरणाचा वेग ६० टक्क्यांवरून ९० टक्के झाले. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवलाच, पण त्याचा विस्तारही केला, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

आज हा निर्णय घेण्यात आला की, राज्यांवर सोपवण्यात आलेले लसीकरणाचे २५ टक्के काम होते, त्याची जबाबदारीही भारत सरकार घेणार आहे. येत्या दोन आठवड्यात केंद्र सरकार नवीन नियमावली लागू करणार आहे. या दोन आठवड्यात केंद्र आणि राज्ये मिळून नवीन नियमावली तयार करतील. योगायोग असा की, दोन आठवड्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिन ही आहे. २१ जूनपासून देशातील सर्व राज्यातील १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देईल. लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी ७५ टक्के लस केंद्र सरकार स्वत: खरेदी करून राज्यांना देईल. त्यामुळे राज्यांना काहीही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला लस खरेदीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही. आतापर्यंत देशातल्या करोडो लोकांना मोफत लस मिळाली आहे. आता यात १८ वर्षांपुढील लोकंही समाविष्ट होतील, अशी घोषणा मोदी यांनी केली.

इंधनदर कमी करता येणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या