25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेच्या कंपनीकडून भारताला मोफत रेमडेसिवीर

अमेरिकेच्या कंपनीकडून भारताला मोफत रेमडेसिवीर

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन: भारतामध्ये असलेला रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा लक्षात घेता अमेरिकेतील ‘गिलियड सायन्स’ या औषध कंपनीने भारताला तब्बल ४.५ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘गिलियड सायन्स’चे मुख्य व्यावसायिक अधिकारी जोहाना मर्सियर यांनी ही घोषणा केली.

भारतामधील कोरोनाची तीव्रता पाहता प्रातिनिधिक पातळीवर तांत्रिक साह्यासाठी परवाना भागीदार उपलब्ध करून देत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याशिवाय स्थानिक उत्पादकांना साह्यभूत ठरतील, अशा सुविधा आणि रेमडेसिव्हिरचे उत्पादन वाढविण्यासाठी ‘अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट’चा (एपीआय) पुरवठा करण्यात येणार आहे.

भारतात कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. भारतामधील कोरोनासंकटाशी सामना करण्याशी आम्हाला जे काही करता येईल, ते करण्यास कटिबद्ध असल्याचे जोहाना मर्सियर यांनी स्पष्ट केले. भारतातील सर्व सात परवानाधारक रेमडेसिवीर उत्पादकांनी उत्पादनासाठी आवश्यक सुविधा वाढवून औषध निर्मिती वाढवली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कोरोना अहवालाशिवाय मतमोजणीला हजर राहण्यास मनाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या