नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारने गरिबांना मोफत किराणा देऊन मदत करण्याचे मोठे काम केले आहे. त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच आता केंद्र सरकारने मोफत गहू आणि तांदूळ पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार १ जूनपासून मोफत गहू आणि तांदूळ बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे कोट्यवधी जनतेला मोठा धक्का मानला जात आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सरकार मोफत गहू आणि तांदूळ वाटप करत होते. आता ते थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीपीएल कार्डधारकांना पूर्वीप्रमाणेच रेशन मिळत राहील. पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून राज्यांना गहू आणि तांदूळ वितरित केले जाते. केंद्राकडून मिळालेले गहू, तांदूळ राज्य सरकारे शिधापत्रिकाधारकांना वितरित करतात. या अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ वाटप केले जाते.
दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्येही गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. त्याच वेळी, यूपी, बिहार आणि केरळमधील कार्डधारकांना आता ३ किलो गहू आणि २ किलोऐवजी ५ किलो तांदूळ दिले जाणार आहेत. दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्येही गव्हाचा कोटा कमी झाल्याची माहिती आहे.
यूपीच्या अन्न आणि रसद विभागाकडून राज्याच्या जिल्हा दंडाधिका-यांना एक पत्र जारी करण्यात आले आहे.
पत्रानुसार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना फेज ६ अंतर्गत अंत्योदय इतर योजनेच्या लाभार्थी आणि पात्र कुटुंबांना पाच महिन्यांसाठी ५ किलोग्रॅम अतिरिक्त अन्नधान्य मोफत वाटप करण्यात आले आहे.
मुदतीपूर्वीच गुंडाळली योजना
भारत सरकारच्या अवर सचिवांच्या पत्रात मे ते सप्टेंबर या पाच महिन्यांसाठी प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळऐवजी एकूण ५ किलो अतिरिक्त धान्याचे जिल्हानिहाय वाटप करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, तत्पूर्वीच योजना गुंडाळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.