नवी दिल्ली : जगातली सर्वात मोठी कोरोना लसीकरणाची मोहीम आपल्या देशात राबविली जात आहे. १ मार्चपासून दुस-या टप्प्यातील लसीकरणाची मोहीम सुरु होणार आहे. त्यात ६० वर्षांहून जास्त वय असणा-या आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणा-या पण, इतर आजारांनी ग्रस्त असणा-या लोकांनी लस दिली जाणार आहे.
या लसीकरण मोहिमेत खासगी रुग्णालयाकडून २५० रुपयांपर्यंत शुल्क घेऊ घेऊ शकतात, तर सरकारी रुग्णालयामध्ये ही लस मोफत मिळणार आहे. याच संदर्भात सरकारने शनिवारी ४५ ते ५९ वर्षांच्या नागरिकांमधील २० आजारांबद्दलची माहिती जाहीर केलेली आहे. कोणतीही व्यक्ती ‘या’ आजारांनी ग्रस्त असेल तर त्यांनी पहिल्यांदा लस दिली जाणार आहे.
केंद्र सरकारने जारी केलेली यादी
१) मागील एका वर्षात हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले व्यक्ती
२) पोस्ट कार्डियक ट्रान्सप्लांट/लेफ्ट वेंट्रिक्युलर सहाय्य डिव्हाइस (एलव्हीएडी)
३) सिग्निफिकंट लेफ्ट वेट्रीकुलर सिस्टोलिक डिसफंशन
४) मॉडरेट किंवा वेल्वुलर हार्ट डिसीज
५) जन्मजात असणारे हृदयासंबंधीचे आजार आणि सिवियर पीएएचकिंवा इडियोपॅथिक पीएएच
६) हृदय रक्तवाहिन्यांचा विकार आणि उच्च रक्तदाबकिंवा मधुमेह
७) एन्गिना आणि उच्च रक्तदाब / मधुमेह उपचार
८) सीटी/एमआरआय डॉक्युमेंट स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब/ मधुमेह
९) फुफ्फुसीय धमनी उच्च रक्तदाब आणि मधुमेह
१०) दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून असणारा मधुमेह आणि उच्च रक्तदाब
११) मूत्रपिंड / यकृत / हेमॅटोपोएटिक स्टेम सेल प्रत्यारोपण केलेले रुग्ण
१२) हेमोडायलिसिस / सीएपीडीवर शेवटच्या टप्प्यात पोहोचलेले मूत्रंिपडासंबंधीचे आजार
१३) सध्या ओरल कोर्टिकोस्टेरॉयचा वापर करत असणा-या व्यक्ती
१४) डिकंपेन्सेटेड सिरोसिस
१५) मागील दोन वर्षात श्वासनासंदर्भातील गंभीर आजाराने रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण
१६) लिम्फोमा/ल्यूकेमिया/मिलोमा
१७) १ जुलै २०२० किंवा त्यानंतर कर्करोगाची पुष्टी झालेले किंवा कॅन्सर थेरपी घेणारे रुग्ण
१८) सिकल सेल रोग/अस्थिमज्जा निकामी होणे/अप्लास्टिक एनेमिया/थॅलेसीमिया मेजर
१९) प्राथमिक इम्यूनोडिफिसिएंसी रोग/एचआयव्ही संक्रमण
२०) अपंगत्व/स्रायू डिस्ट्रोफी/एसिड हल्ल्यामुळे श्वासनास त्रास होणा-या व्यक्ती/ अत्याधिक अपंगत्व असणा-या व्यक्ती/अंधत्व/बहिरेपणा़
भारतात दुस-या लाटेचा सौम्य प्रभाव