22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीय१ एप्रिलपासून प्रवासी वाहनांमध्ये फ्रंट एअरबॅग अनिवार्य

१ एप्रिलपासून प्रवासी वाहनांमध्ये फ्रंट एअरबॅग अनिवार्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन केंद्रसरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून नवीन वाहनांना पुढच्या सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य असतील,असा प्रस्ताव कायदा मंत्रालयाने मान्य केला आहे. विद्यमान मॉडेल्ससाठी नवीन नियम ३१ ऑगस्टपासून लागू केला जाईल, असेही सांगण्यात येत आहे.

रस्ता परिवहन व महामार्ग मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी कायदा मंत्रालयाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. ज्यात त्यांनी वाहन उत्पादकांना पुढच्या सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग बसविणे बंधनकारक करण्यात यावे असे नमुद केले होते. हा प्रस्ताव कायदा मंत्रालयाने मान्य केला आहे. आतापर्यंत, सर्व कारसाठी फक्त ड्रायव्हर सीटसाठी एअरबॅग अनिवार्य आहे. तथापि एअरबॅगद्वारे संरक्षित नसल्यामुळे समोरच्या सीटवरील प्रवाशाला गंभीर दुखापत किंवा अपघात झाल्यास मृत्यूचा धोकाही संभवतो यामुळेच ही तरतूद करण्यात आली. केंद्र सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या प्रस्तावाबाबत सामान्य जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. मिळालेल्या सुचनांचा उहापोह करुन हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या सुत्रांनी सांगितले.

विद्यमान मॉडेल्साठी ३१ ऑगस्टपासून लागू
विद्यमान मॉडेल्ससाठी नवीन नियम ३१ ऑगस्टपासून लागू केला जाईल. मुळात प्रस्तावित अंतिम मुदत जून २०२१ होती जी आता वाढविण्यात आली आहे. स्पीड ऍलर्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि सीट-बेल्ट इंडिकेटर यासारख्या बाबी समाविष्ट करणे बहुतेक कारमधील वैशिष्ट्ये बनली आहेत परंतु तरीही लाइफ-सेव्हिंग एअरबॅग या अनिवार्य नव्हत्या. यापूर्वी सर्व कारमधील ड्रायव्हरच्या आसनासाठी सरकारने एअरबॅग अनिवार्य केले होते. १ जुलै २०१९ पासून ही सूचना अंमलात आणण्यात आली.

अर्थव्यवस्थाही कोरोना पॉझिटिव्ह, कृषी वगळता सर्व क्षेत्राला फटका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या