31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयइंजिनीअर्सनी गच्चीवर पिकवल्या फळभाज्या

इंजिनीअर्सनी गच्चीवर पिकवल्या फळभाज्या

इंजिनीअर्सनी गच्चीवर पिकवल्या फळभाज्या

एकमत ऑनलाईन

बेंगळूरू: लॉकडाउनच्या काळाने अनेकांना काही ना काहीतरी शिकवलेच आहे. या लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत बेंगळुरूमधल्या सात सॉफ्टवेअर इंजिनीअर्सनी गच्चीवर फळभाज्या पिकवल्या आहेत. हेन्नूरमध्ये कनकश्री येथे राहणारे हे सात जण इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

अचानक लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करणारे रवी कुमार रेड्डी यांच्या सुपीक डोक्यात ही कल्पना सुचली. शेतकºयाचा मुलगा असल्याने आपल्याला शेतीविषयक काही गोष्टी माहित होत्या आणि आता काम करता करता आणखी काही गोष्टी समजल्या, असे रेड्डी यांनी सांगितले. रेड्डी त्यांच्या इमारतीच्या टेरेसवर १५ विविध प्रकारच्या भाज्या पिकवतात. भेंडी, बीट, टोमॅटो, मिरची, कांदे यांची लागवड त्यांनी केली आहे. रेड्डी यांचे काम पाहून त्याच परिसरातील सहा इंजिनीअर्सनी त्यांना साथ दिली.

वापरल्या जाणा-या पाण्याचा केला सदुपयोग
विशेष म्हणजे या झाडांना ८० टक्के पुनर्वापर केलेले पाणी दिले जाते. यासाठी साबण आणि डिटर्जंट यांचा वापर त्यांनी थांबवला आहे. घरकामात वापरले गेलेले पाणी नंतर झाडांना दिले जाते. पावसाच्या पाण्याचाही पुनर्वापर करत असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

नोकरी करताना कधीच असे काही करण्याची कल्पना डोक्यात आली नसती. लॉकडाउनमुळे वेळ मिळाला आणि हे सगळे करण्याचा वेगळाच आनंद मिळाल्याचे ते सांगतात. गच्चीवर पिकणा-या भाज्या या सात जणांच्या कुटुंबीयांसाठी पुरेसे असतात. त्यात कुठल्याही प्रकारचे केमिकल्स वापरण्यात आले नाही. त्यामुळे या ताज्या भाज्यांची चवसुद्धा बाजारातून विकत आणलेल्या भाज्यांपेक्षा खूप वेगळी असते, असे ते म्हणतात.

Read More  आसाममध्ये ऑइल इंडिया लिमिटेडच्या गॅस विहिरीत भीषण आग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या