26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयजानेवारीपासून ६९ वेळा इंधन दरवाढ

जानेवारीपासून ६९ वेळा इंधन दरवाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र, दरवाढ थांबताना दिसत नाही. पेट्रोल, डिझेलचे भाव जवळपास रोज वाढताना दिसत आहेत. यंदा जानेवारीपासून केंद्र सरकारने तब्बल ६९ वेळा दरवाढ केली असून, यातून तब्बल ४.९१ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही रग्गड कमाई सुरूच आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाला असून, यात सामान्य माणूस होरपळून निघत आहे. त्यामुळे कॉंग्रेसने मोदी सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

यावर्षी १ जानेवारीपासून केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तब्बल ६९ वेळा वाढ केली आहे. त्यातून ४.९१ लाख कोटी एवढी कमाई केली हे, असा दावा कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. केंद्रातील मोदी सरकारला सामान्य जनतेशी देणे-घेणे नाही. तसेच सर्वसामान्यांमच्या दु:खाबाबत भाजप सरकारला चिंता नाही. देशभरातील अ्ननेक ठिकाणी पेट्रोलचे दर १०० च्या पुढे गेले आहेत, तर डिझेलचे दरही शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. तसेच गॅस सिलिंडरही ८५० रुपयांवर गेले आहे. यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे, असेही चौधरी म्हणाले.

दरवाढीचा धडाका सुरूच
पेट्रोल, डिझेलचे दर जवळपास रोज वाढल्याचे चित्र आहे. शनिवारीदेखील पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढविण्यात आल्या. त्यामुळे पेट्रोल सव्वाशेरुपये लिटरपर्यंत जाते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे, तर डिझेलदेखील शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे सामान्य माणूस त्रासून गेला आहे.

भाजपने आतापर्यंत २५ लाख कोटी कमावले
२०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले. तेव्हापासून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून तब्बल २५ लाख कोटी रुपये कमावले आहेत, असा दावा कॉंग्रेसने केला आहे. छत्तीसगडमधील सरकारने व्हॅटमध्ये १२ रुपयांची कपात केली. त्यामुळे पेट्रोलचे दर १२ रुपयांनी कमी झाले. मात्र, मोदी सरकारला अजूनही पाझर फुटलेला नाही. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे.

बार्टी विम्बल्डनची नवी सम्राज्ञी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या