24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयइंधनदरवाढ सुरूच

इंधनदरवाढ सुरूच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सलग दुस-या दिवशी गुरूवारी पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाली. राजधानी दिल्लीत बुधवारीच पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली होती. जुलै महिन्यात सहाव्यांदा इंधनदरात वाढ नोंदवण्यात आली आहे. जून आणि मे महिन्यात पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये प्रत्येकी १६ वेळेस ऑईल रिटेलर्सकडून दर वाढवण्यात आले. देशात पेट्रोल दरात ३५ पैसे तर, डिझेल दरात ९ पैशांनी वाढ झाली आहे.

सध्या दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू- कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, सिक्कीम आणि लडाखमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. देशात तीन ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले जातात. पेट्रोल, डिझेलच्या दरावर एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन तसेच इतर कर लावण्यात येत असल्याने प्रत्येक ठिकाणी दर वेगवेगळे दिसून येतात. अनेकदा हे दर दुप्पट होतात.
चार महानगरातील पेट्रोल, डिझेलचे दर

राज्य पेट्रोल डिझेल
१) दिल्ली १००.५६ ८९.६२
२) मुंबई १०६.५९ ९७.१८
३) कोलकाता १००.६२ ९२.६५
४) चेन्नई १०१.३७ ९४.१५

कोरोनाची तिसरी लाट ९८ दिवसांची?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या