28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयइंधन दर कमी होणार?

इंधन दर कमी होणार?

एकमत ऑनलाईन

इंधन दर कमी होणार?
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्य वाढत्या महागाईने त्रस्त झालेला आहे. आता कच्च्या तेलाच्या किमती सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड) किमती ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रतिलिटर ३ रुपयांनी कमी होऊ शकतात. याआधी फेब्रुवारीमध्ये कच्च्या तेलाचा दरप्रति बॅरल ९० डॉलरच्या जवळ होता.

कच्च्या तेलाची घसरण सुरूच आहे. जूनमध्ये क्रूड १२५ डॉलर प्रतिबॅरलच्या जवळ पोहोचले होते. सध्या ते प्रतिबॅरल ९२ डॉलरवर व्यापार करत आहेत. म्हणजेच ते आतापर्यंत सुमारे २६ टक्क्यांनी कमकुवत झाले आहे. युरोप, चीनमधील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर दबाव आहे. इतर अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अजूनही अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत क्रूडची मागणी पुढे कमजोर राहण्याची भीती आहे.
यासंदर्भात आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी आणि करन्सी) अनुज गुप्ता यांनी सांगितले की, क्रूड येत्या काही दिवसांत ८५ डॉलर प्रतिपिंपपर्यंत खाली येऊ शकते. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दरही प्रतिलिटर २ ते ३ रुपयांनी कमी होऊ शकतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या