27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयइंधन दर कमी होणार नाहीत

इंधन दर कमी होणार नाहीत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी वाढत्या दरावर वक्तव्य केले आहे. कच्च्या तेलाच्या दरांत मोठी घट झाली असली तरी भारतीय ऑईल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कपात करणार नाहीत असे हरदिप सिंग पुरी म्हणालेत.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंग पुरी यांना माध्यमांद्वारे एक प्रश्न विचारण्यात आला होता. मागल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरांत घट होऊ शकते काय? त्याचे उत्तर देत हरदीप पुरी यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

विकसित देशांमध्येही ४० टक्क्यांनी वाढ
हरदीप सिंग पुरी म्हणाले, की विकसित देशांत २१ जुलै ते २२ ऑगस्ट पर्यंत इंधनांच्याकिंमतीत ४० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. मात्र भारतीय दरांमध्ये २.१२ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र कंपन्या त्यांच्या नुकसानभरपाईसाठी दर वाढवणे सुरूच ठेवणार आहे.

सिलिंडरचे दर कमी झालेत
मागल्या दोन वर्षांमध्ये आयात बेंचमार्कमध्ये जवळपास ३०३ टक्क्यांनी वाढ झाली. तर भारतात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरांत २८ टक्के घट बघायला मिळाली असेही यावेळी पुरी म्हणाले.

जगभरात किंमती वाढल्या
जुलै महिन्यात २१ जुलै ते २२ ऑगस्ट दरम्यान प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यापारिक केद्रांमध्ये गॅसच्याकिंमतीमध्ये वाढ नोंदवल्या गेली. तर यूएसएच्या हेनरी हबमध्ये १४० टक्के वाढ नोंदवल्या गेली. तर ब्रिटनमध्ये २८१ टक्के वाढ बघितल्या गेली. मात्र एकमेव भारतात ही वाढ ७१ टक्के होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या