22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयअग्निपथ भरतीला पूर्ण सहकार्य : मान

अग्निपथ भरतीला पूर्ण सहकार्य : मान

एकमत ऑनलाईन

चंडीगड : केंद्र सरकारच्या अग्निपथ या लष्करभरती प्रक्रियेला आम्ही पूर्ण पाठिंबा देत सहकार्य करू असे आश्वासन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुरक्षा दलांना दिल्यानंतर राज्यातील भरतीला चालना मिळण्याची शक्यता आहे. या भरतीसाठी स्थानिक प्रशासन आणि अधिकारी यांच्याकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी शिफारस आम्ही लष्कराच्या मुख्यालयाकडे करणार आहोत. अशी भूमिका बड्या लष्करी अधिका-यांनी घेतली होती.

स्थानिक अधिकारी हे राज्य सरकारकडून निर्देश अथवा निधी मिळाला नसल्याचे कारण देत भरतीसाठी टाळाटाळ करत असल्याची तक्रार लष्कराच्या जालंधर कँटोन्मेंट झोनच्या निवड अधिका-यांनी पंजाबचे मुख्य सचिव व्ही. के. जांजुआ आणि मुख्य सचिव (रोजगार) कुमार राहुल यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या