नवी दिल्ली: ईशान्य भारतातील म्यानमारच्या सीमेलगत बंडखोरी करणा-या नागा अतिरेकी संघटनांना भारताविरोधात अतिरेकी कृत्ये करण्यासाठी चीन प्रोत्साहन देत असल्याची माहिती भारतीय अधिका-यांकडून देण्यात आली आहे. अधिका-यांच्या या खुलाशानंतर गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन दरम्यान वाढलेल्या तणावात आणखी भर पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
चीनकडून गेल्या सहा महिन्यांपासून पुर्व लडाख भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण करण्यात आला आहे. गलवान खो-यातील चकमकीत मार खाऊनही चीनचा आडमुठपणा काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. आता म्यानमारला लागून असलेल्या नागालँडमधील फुटीरवादी गट युनायटेड वा स्टेट आर्मी व आराकान आर्मी यांना चीनकडून भारताविरोधात शस्त्रपुरवठा केला जात असून लपण्यासाठी जागानिर्मिती करण्यासाठीही सहाय्य केले जात असल्याचा खुलासा काही भारतीय अधिका-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.
कुनमिंग शहरात मिळतेय प्रशिक्षण
भारताच्या काही गुप्तचर संस्थांनी मोदी सरकारला याबद्दल अनेकदा माहिती दिली असल्याचेही सुत्रांनी सांगितले. संबंधित बंडखोरांच्या चार म्होरक्यांना चीनमधील दक्षिण भागातील कुनमिंग शहरात भारतविरोधी घातपाती कारवायांसाठी प्रशिक्षण दिले जात असल्याचेही अधिका-यांकडून सांगण्यात आले.
निवृत्त चीनी लष्करी अधिका-यांचा हात
नागालँडच्या म्यानमारला लागून असलेल्या सीमेवरील भागात स्वतंत्र क्षेत्रासाठी नागा बंडखोरांचे काही गट प्रयत्नशील असून चीनी सैन्यातील निवृत्त अधिकार व एजंट यांच्याकडून त्यांना सर्वप्रकारचे अतिरेकी कारवायांसाठी लागणारे प्रशिक्षण पुरविले जात असल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.
बिबटयाच्या हल्यात करमाळयातील आठ बर्षीय चिमूरडी ठार