८०० कोटींच्या कंत्राटातून काढले बाहेर
नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील सीमेवर तणाव कमी होत असतानाही भारताने चीनला आर्थिक धक्के देण्याचा सपाटा सुरू ठेवला असून, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गासाठी चीनच्या दोन कंपन्यांनी लावलेली बोली रद्द करण्यात आली आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे कंत्राट जवळपास ८०० कोटी रुपयांचे आहे.
दोन चिनी कंपन्यांना लेटर आॅफ अॅवार्ड देण्यास नकार दिला. एखादे कंत्राट मंजूर झाल्यानंतर संबंधित कंपनीला लेटर आॅफ अॅवॉर्ड देण्यात येते. मात्र, चिनी कंपन्यांना ते दिले गेले नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जिगांक्सी कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग कार्पोरेशनच्या उपकंपन्यांना धक्का बसला आहे. आता हे कंत्राट कमी बोली लावणा-या दुस-या कंपनीला देण्यात येणार आहे. या अगोदर जिगांक्सी कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग कार्पोरेशनच्या दोन कंपन्यांनी लावलेली बोली कंत्राटासाठी योग्य ठरली होती. मात्र, तरीही या कंपन्यांना लेटर आॅफ अॅवॉर्ड देण्यात आला नाही.
त्यामुळे हे कंत्राट दुस-या कंपन्यांना मिळू शकते. या अगोदर गडकरी यांनी महामार्गाच्या योजनांमधून चिनी कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानंतर आता चिनी कंपन्यांना दिल्ली-मुंबई द्रुतगर्ती मार्गाच्या कंत्राटातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
Read More धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर