23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeक्राइमप्रियकराला मारहाण करुन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

प्रियकराला मारहाण करुन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

एकमत ऑनलाईन

म्हैसूर : कर्नाटकातील बेंगळुरुपासून सुमारे १५० किलोमीटर असलेल्या म्हैसूरमध्ये सामूहिक बलात्काराची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांच्या टोळीने एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. यासोबतच तिच्या कथित प्रियकराला पैसे न दिल्याबद्दल बेदम मारहाण करण्यात आली. पीडित विद्यार्थिनी ही उत्तर प्रदेशची रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली, जेव्हा मुलगी आपल्या प्रियकरासोबत घरी परतत होती.

म्हैसूरमधील चामुंडी डोंगराच्या पायथ्याशी दरोडेखोरांच्या टोळीने मुलीवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली, जेव्हा मुलगी आपल्या प्रियकरासह घरी परतत होती. ती त्याच्यासोबत चामुंडी डोंगर परिसरात फिरायला गेली होती. तिथे काही लोकांनी दोघांना घेरले आणि त्यांच्याकडून पैसे मागू लागले. यानंतर आरोपी पीडितेला आणि तिच्या मित्राला निर्जन स्थळी घेऊन गेले.

प्रियकरावर दगडाने हल्ला
यानंतर दोन जणांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि प्रियकरावर दगडाने हल्ला करून त्याला जखमी केले. ते सतत प्रियकराला पैशांची मागणी करत होते. पीडित मुलगी उत्तर प्रदेशातून म्हैसूरला अभ्यासासाठी आली होती. ती एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे सांगितले जात आहे.

आरोपी बेपत्ता
घटनेनंतर जवळपास २४ तासांनंतरही आरोपी बेपत्ता आहेत. पीडितेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६-ड अंतर्गत सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच अरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

साखरा पाटी ते मुरुड अकोला रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या