24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeराष्ट्रीयमहिलेवर सामूहिक बलात्कार

महिलेवर सामूहिक बलात्कार

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारची राजधानी पाटणाजवळ बक्सर भागात एका महिलेसोबत तिच्या लहानग्यासमोरच सामूहिक बलात्कार केल्याची आणि विरोध करणा-या पाच वर्षांच्या मुलाच्या हत्येची क्रूर घटना उघडकीस आली आहे़ आरोपींनी महिला आणि तिच्या मुलाला मृत समजून नाल्यात फेकून दिले.

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे़ पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुरार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ओझा बराक गावात ही घटना घडली आहे़ पीडित महिला आपल्या पाच वर्षांच्या मुलासोबत बँकेच्या काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती. या दरम्यान काही आरोपींनी तिला आणि तिच्या मुलाला रस्त्यातच रोखलं. आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

यावेळी रडून ओरडून आपल्या आईची सुटका करणा-या चिमुरड्याचा गळा दाबून आरोपींनी त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी महिला आणि मुलाला मृत समजून जवळच्याच नाल्यामध्ये फेकून दिले आणि घटनास्थळावरून फरार झाले.

राज्यांना उधार घेण्यास सांगणे हास्यास्पद – राहुल गांधी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या