24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीयहत्येतील आरोपी महिलेवर सामूहिक बलात्कार

हत्येतील आरोपी महिलेवर सामूहिक बलात्कार

एकमत ऑनलाईन

रीवा : मध्य प्रदेशातील रीवा येथे कोठडीत पाच पोलिस कर्मचाºयांनी १० दिवस सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप हत्येतील आरोपी महिलेने केला आहे. मनगवा पोलिस ठाण्याचे प्रभारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाºयावरही या महिलेने आरोप केला आहे. एका हत्या प्रकरणात ही महिला आरोपी असून, ती सध्या कोठडीत आहे.

१० ऑक्टोबर रोजी तुरुंगातील कोठडीत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि वकिलांचे पथक गेले होते. त्यावेळी कोठडीत पाच पोलिस कर्मचाºयांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला. त्यानंतर न्यायाधीशांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, रीवाच्या पोलिस अधीक्षकांना कारवाई करण्यासंदर्भात पत्र लिहिले.

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, न्यायालयाकडून आदेशाचे पत्र मिळाले आहे. आरोप करणारी महिला ही हत्येतील आरोपी आहे. ९ मे ते २१ मे या दरम्यान पोलिसांनी कोठडीत बलात्कार केल्याचा तिने आरोप केला आहे. मात्र, या महिलेला २१ मे रोजी अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. मानगवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुधा वर्मा नावाच्या महिलेची हत्या झाल्यानंतर पाच दिवसांनी आरोपी महिलेला अटक केली होती, असे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कानपूरात तरुणीवर सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कानपूरमधील देहातमध्ये रविवारी रात्री उशिरा एका २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. गावातील दोन तरुणांनी घरात घुसून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून देहात पोलिसांत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी पथकाची स्थापना केली आहे.

कानपूर देहातमधील डेरापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमौली येथील २२ वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ८ आॅक्टोबरला रात्री १० वाजताच्या सुमारास गावातील दिनेश आणि उमेश त्यांच्या घरात घुसले. त्यांना प्रतिकार केला असता, शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी बलात्कार केला. तसेच जातीवरून शिवीगाळ केली. याबाबत कुठेही वाच्यता केली तर, जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. धमकावल्यानंतर दोघेही तरूण निघून गेले. पीडितेने घडलेल्या घटनेची माहिती आईवडिलांना दिली. त्यानंतर पीडितेसह कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

राजस्थानात दोन बहिणींवर बलात्कार
राजस्थानमध्ये बलात्कार व सामूहिक बलात्कारासह अन्य गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. आता येथील जालोरच्या भीनमाल ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी सहा तरूणांनी एका गावातील दोन अल्पवयीन बहिणींना सुमसाम असलेल्या टेकडीवर नेले व तिथे त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी या मुलींना जसवंतपुरा ठाणे क्षेत्रातील राजपुरा येथील सुंधामाता टेकडीवर बेशुद्ध अवस्थेत सोडून पळ काढला. स्थानिकांना याबाबत माहिती मिळाताच त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांकडूनही या मुलींना योग्य वागणूक मिळाल नसल्याचे सांगितले जात आहे. जखमी झालेल्या व वेदनने विवहळत असलेल्या त्या दोघींसाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही. अखेर त्यांना एका रिक्षात झोपून रुग्णालयात नेण्यात आले. या दोघींपैकी एकीची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे माहिती समोर आली आहे.

हरलो तर कदाचित देशच सोडेन डोनाल्ड ट्रम्प

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या