26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयहव्या त्या वितरकांकडून घेता येणार गॅस सिलिंडर

हव्या त्या वितरकांकडून घेता येणार गॅस सिलिंडर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील घरगुती गॅस वापरणा-या ग्राहकांची सुविधा आणि त्यांना सुलभतेने उत्तम दर्जाची सेवा मिळण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने गेल्या काही काळात प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता ग्राहकांना हव्या त्या वितरकाकडून गॅस सिलिंडर घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशातील काही प्रमुख शहरांत प्रायोगिक तत्त्त्वावर हा प्रयोग राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकरच आपल्याला हव्या त्या वितरकाकडून गॅस सिलेंडर भरून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

घरगुती गॅस वापरणा-या ग्राहकांची सोय व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाकडून वेगवेगळ््या पातळ््यांवर प्रयत्न केले जात असून सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ही सुविध उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशातील वेगवेगळ््या शहरांमध्ये या सुविधेची चाचपणी केली जात असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले. पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशातील काही शहरांमध्ये ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला उपलब्ध होणार असून त्याच्या निष्कर्षांनंतर व्यापक स्तरावर देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

गेल्या वर्षभरापासून देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे अनेक कंपन्यांनी ऑनलाईन किंवा मोबाईलवर सिलिंडर बुक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. इंडेन, एचपी आणि भारत पेट्रोलियम या प्रमुख कंपन्यांचे गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. त्यानुसार मोबाईल अ‍ॅप किंवा ऑनलाईन वेबसाईटवरून सिलिंडर बुकिंग करताना ग्राहकांना त्यांच्या परिसरात सेवा देणा-या डिलिव्हरी डिस्ट्रिब्युटर्सची अर्थात वितरकांची यादी दाखवली जाईल. त्यामधून ग्राहकांना हवा तो पर्याय निवडण्याची सुविधा असणार आहे. यातून ग्राहकांची सोय होण्यास मदत होणार आहे. गॅस सिलिंडरच्या वेगवेगळ््या एजन्सी आहेत. मात्र, ज्यांना जी सोयीची आहे, तिथून गॅस घेणे यातून सोपे होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ही योजना हाती घेतली आहे.

पुण्यासह या शहरांत प्रायोगिक तत्त्वावर योजना
केंद्र सरकारने ग्राहकांच्या सोयीसाठी गॅस सिलिंडर कोणत्याही एजन्सीकडून घेण्याचा पर्याय देण्याची योजना सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो का, त्यात काय अडचणी येतात, या सर्व बाबी तपासण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही शहरांची निवड केली आहे. त्यामध्ये पुणे शहरासोबतच चंदीगढ, कोईम्बतूर, गुरगाव आणि रांची या शहरांचा समावेश आहे. या शहरांत प्रथम प्रयोग सुरू केला जाईल. त्यानंतर देशात सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

परिसरातील कोणत्याही कंपनीकडून गॅस घेता येणार
सध्या एचपी, भारत पेट्रोलियम आणि इंडेन या कंपन्यांचे गॅस सिलिंडर वापरासाठी उपलब्ध आहेत. मात्र, हे सिलेंडर वितरित करण्यासाठी स्थानिक पातळीवर वितरकांना एजन्सी दिली जाते. मात्र, आता आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही वितरकाकडून आपण संबंधित कंपनीचा गॅस सिलेंडर घेऊ शकणार आहोत. त्यामुळे ग्राहकांची सोय होण्यास मदत होणार आहे.

स्पर्धेमुळे सेवेचा दर्जा सुधारणार
कोणत्याही वितरकांकडून गॅस सिलिंडर घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास वितरकांमध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून ग्राहकांना मिळणा-या सेवेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. तसेच ग्राहकांनादेखील पर्याय निवडण्याचा अधिकार मिळेल. वितरकांना त्यांची सेवा सुधारण्यासाठीदेखील मदत मिळू शकेल. दरम्यान, ही सेवा प्रायोगिक तत्वावर कधीपासून सुरू होईल, याविषयी अधिकृतपणे जाहीर केले जाईल, असे पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले.

पहिल्यांदा राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या