37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयजीडीपीची १३.७ टक्क्यांनी वाढ होणार?

जीडीपीची १३.७ टक्क्यांनी वाढ होणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशावर निर्माण झालेले आर्थिक मंदीचे सावट हळूहळू दूर होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे पुन्हा सुरू झाल्याने देशाचा आर्थिक गाडा पूर्वपदावर येत आहे. कोविड-१९ साठीच्या लसीकरणामुळे बाजारात आत्मविश्वास वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर मुडीज या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने गुरुवारी १ एप्रिलपासून सुरू होर्णा­या २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीच्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज १०.८ टक्क्यांपासून वाढवून १३.७ टक्क्यांपर्यंत केला आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी यूएस-आधारित मुडीज या रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे की, अर्थव्यवस्था ७ टक्क्यांपर्यंत घसरेल, जी आधीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. या आधी मुडीजने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये १०.६ टक्क्यांपर्यंत घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसचे असोसिएट मॅनेजिंग डायरेक्टर (सॉवरेन रिस्क) जीन फांग म्हणाले की, आमचा सध्याचा अंदाज असा आहे की दैनंदिन सामान्यीकरणाच्या प्रभावामुळे मार्च २०२१ रोजी संपणाºया चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था ७ टक्के घसरेल आणि पुढील आर्थिक वर्षात १३.७ टक्के वाढीची अपेक्षा आहे. मुडीज आणि आयसीआरए यांच्या वतीने आयोजित इंडिया क्रेडिट आउटलुक २०२१ या विषयावरील आॅनलाईन परिषदेत फँग यांनी सांगितले की, लसीकरणामुळे बाजारपेठा सामान्य स्थितीत परत येण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.

 

माहेरच्यांना संपत्तीचा वारस नेमण्याचा हिंदू महिलांना अधिकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या