22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयसचिन पायलटांना रोखण्यासाठी गेहलोतांचा मास्टर प्लान

सचिन पायलटांना रोखण्यासाठी गेहलोतांचा मास्टर प्लान

एकमत ऑनलाईन

जयपूर : देशाच्या राजकारणात काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेकांची नावे चर्चेत आली आहेत. सध्या या शर्यतीत अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांची नावेआघाडीवर आहेत.

दरम्यान, अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असली, तरी आताही त्यांचा राजस्थानबद्दलचा मोह सुटत नाही. ते सचिन पायलट यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी सर्व फिल्डिंग लावत आहेत. गेहलोत यांनी त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून सोनिया गांधींना विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांचे नाव सुचविल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री पदासाठी रघु शर्मा आणि बीडी कल्ला यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. हे दोन्ही नेते सीपी जोशींप्रमाणे ब्राह्मण समाजातून येतात. शिवाय, गेहलोत गटातील प्रभावशाली नेत्यांपैकी आहेत. या नेत्यांशिवाय शांतीलाल धारीवाल यांचेही नाव चर्चेत आहे. ते वैश्य समाजातून येतात. धारीवाल यांची राज्याच्या राजकारणात चांगली पकड आहे.

तसेच राजस्थान काँग्रेसमध्ये परसादी लाल मीणा यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे, राजस्थानमध्ये १३ टक्के लोकसंख्या असलेला एसटी समाज हा दलितांनंतरचा दुसरा सर्वात मोठा मतदार गट आहे. एवढेच नाही तर या एसटी प्रवर्गात सर्वाधिक संख्या ही मीणा बिरादरींची असून, ती राज्यात ७ टक्के आहे. अशा स्थितीत सामाजिक समतोल जपत अशोक गेहलोत परसादी लाल मीना यांच्या नावाचाही प्रस्ताव देऊ शकतात. हायकमांडलाही यावर आक्षेप नसेल. याशिवाय सचिन पायलट गटही त्यांना विरोध करू शकणार नाही, मात्र एसटी समाजातून नाराजी निर्माण होण्याचा धोका आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या