30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeआंतरराष्ट्रीययुद्धासाठी तयार रहा

युद्धासाठी तयार रहा

शी जिनपिंग ; चीनच्या सैन्याला आदेश; चीनशी निष्ठा राखण्याचे आवाहन

एकमत ऑनलाईन

बीजिंग: पूर्व लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आहे. त्यापार्श्वभुमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्या सैन्याला युद्धासाठी सज्ज व्हा, असा आदेश दिल्याने तणावात भर पडली आहे.

जिनपिंग यांनी मंगळवारी गुआंगडोंग या चीनच्या लष्करी तळाला भेट दिली. प्रचंड सतर्क रहा आणि युद्धाच्या तयारीवर ऊर्जा केंद्रीत करा असे जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला आवाहन केले. भारत, अमेरिका किंवा , अन्य कुठल्या देशासंदर्भात जिनपिंग यांनी हे वक्तव्य केले, ते अजून स्पष्ट झालेले नाही.मात्र सैन्याला हा आदेश देताना जिपपिंग यांनी एकप्रकारे आपल्याच सैन्याच्या क्षमतेवर अविश्वास दाखवला आहे. जिनपिंग यांनी त्यांच्या सैन्याला आदेश देताना ‘देशाशी पूर्णपणे निष्ठावान रहा,’ असेसांगून अविश्वासही व्यक्त केला आहे. शिन्हुआ या चिनी वृत्त संस्थेच्या हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिले आहे.

भारत, अमेरिका आणि दक्षिण चीन सागरातील अन्य देशांबरोबर चीनचा सध्या वाद सुरु आहे. भारताला लागून असलेल्या सीमेवर तर प्रचंड तणावाची स्थिती आहे. जून महिन्यात गलवान खो-यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा अधिक सैनिक ठार झाले. त्यानंतर पँगाँग त्सो सरोवर परिसरात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. चीनची कुठलीही दादागिरी सहन न करता, भारतानेही प्रत्येकवेळी चीनला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण चीन सागरात अमेरिकेबरोबरही त्यांचा वाद सुरु आहे.

सर्व शासकीय क्षेत्रांत बीएसएनल आणि एमटीएनएल सेवा अनिवार्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या