21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयमास्क न घालणाऱ्या कोविड सेंटरमध्ये कामाला लावा

मास्क न घालणाऱ्या कोविड सेंटरमध्ये कामाला लावा

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : भारतात सर्व राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. गुजरातमध्ये तर त्याची तीव्रता जास्त आहे. अद्यापही लसीच्या चाचण्या सुरुच असून मास्क घालणे हाच खात्रीचा उपय असे सर्व तज्ज्ञ ओरडून सांगत आहेत. मात्र सामान्य नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वर्तनावर गुजरात उच्चन्यायालयाने संताप व्यक्त केला असून मास्क न घालणा-यांना कोरोना सेंटरमध्ये १५ दिवस कामाला लावा,असे सांगितले आहे.

विशाल अवतणी या सामाजिक कार्यकर्त्याने याबाबत याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ व न्यायमूर्ती जे.बी. पर्दीवाला यांच्या खंठपीठाने राज्य सरकारला हे निर्देश दिले आहेत. जे नागरिक कोरोनाविषयी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत, त्यांना कोविड सेंटरमध्ये ५ ते १५ दिवस सेवा करणे अनिवार्य करणारे आदेश काढण्यात यावे, असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले आहे.

वय, पात्रता, लिंग यानुसार शिक्षा
नियमभंग करणारांकडून कोविड सेंटरमध्ये दिवसांतून चार ते पाच तास काम करून घेण्यात यावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. नियमभंग केलेल्या नागरिकांकडून कोविड सेंटरमध्ये स्वच्छता, जेवण तयार करणे, मदत करणे, सेवा करणे, कोविड केंद्रातील इतर कामे, त्याचबरोबर माहिती संकलित करण्याची कामे करून घेतली जाणार आहेत.शिक्षा नियमभंग करणा-या व्यक्तीच्या वय, पात्रता, लिंग यानुसार ठरवली जाणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील कार्य अहवाल २४ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लसीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या