27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीय‘गजनी बायडन’फक्त एक वर्षच टिकतील

‘गजनी बायडन’फक्त एक वर्षच टिकतील

कंगनाचे भाकीत ; नव्या वादाला निमंत्रण ?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या विविध वक्तव्यांमुळे आणि ट्विटमुळे चांगलीच चर्चेत असते. आता तिने अमेरिकेचे नवीन राष्टÑाध्यक्ष ज्यो बायडन यांचा उल्लेख गजनी असा करीत ‘ गजनी बायडन हे एक वर्षाहून अधिक काळ टिकणार नाहीत असे भाकित केले आहे. कंगनाच्या या ट्विटनंतर तिच्यावर पुन्हा टीका होण्याचे संकेत आहेत.

गजनी बायडन यांचा डेटा दर पाच मिनिटाला क्रॅश होतो. इतकी औषधे आणि इतकी इंजेक्शन त्यांना दिली गेली आहेत त्यामुळे ते फार तर वर्षभर टिकतील या आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

कमला हॅरिस यांची स्तुती
एकीकडे ज्यो बायडेन यांच्यावर टीका करणाºया कंगनाने दुसरीकडे मात्र अमेरिकेच्या नुतन उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची स्तुती केली आहे. ‘जेव्हा एक स्त्री तिची कारकीर्द स्वत: घडवते तेव्हा ती इतर महिलांसाठी त्या वाटा तयार करत असते असे म्हणत कंगनाने कमला हॅरीस यांचे तोंड भरुन कौतुक केले आहे.

बायडेन देणार ५ लाख भारतीयांना नागरिकत्व

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या