22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयगुलाम नबी आझादांची नवा पक्ष काढण्याची घोषणा

गुलाम नबी आझादांची नवा पक्ष काढण्याची घोषणा

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, नवीन पक्षाचे नाव आणि झेंडा हे काश्मीरचे लोक ठरवतील असेही आझाद यांनी म्हटले आहे. काँग्रेसला रामराम केल्यानंतर प्रथमच गुलाम नबी आझाद हे आज जम्मू काश्मीरच्या दौ-यावर आहेत. त्यांची आज सैनिक कॉलनीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी नवीन राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे.

आज जम्मू काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री गुलाम नबी यांचे भव्य स्वागत केले. तसेच त्यांच्या समर्थनार्थ रॅलीदेखील काढण्यात आली. काँग्रेसला रामराम केल्यानंतर प्रथमच गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीर दौ-यावर आले आहेत. यावेळी त्यांची सैनिक कॉलनीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी नवीन राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा केली. गुलाम नबी आझाद यांनी दिलेल्या राजीनाम्यात पक्षाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता. प्रत्येक निर्णय कोणाशीही सल्लामसलत न करता घेतल्याचे आझाद म्हणाले होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा अपमान होत असल्याचा आरोप देखील आझाद यांनी केला होता.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या