बंगळुरू : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीची चाकू भोसकून हत्या केली. प्रियकराने प्रेयसीवर चाकूने तब्बल १६ वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बंगळुरू येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
बंगळुरू शहर पूर्व विभागाचे डीसीपी भीमाशंकर एस. गुलेद यांनी सांगितले की, मृत प्रेयसीचे नाव लीला पवित्रा नीलमणी (२५, काकीनाडा, आंध्र प्रदेश) तर आरोपी प्रियकराचे नाव दिनकर बनाला (२८) आहे. प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने आरोपीने तिची १६ वार करून हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीची आणि तिच्या प्रियकराची जात वेगळी होती. भिन्न जातीतील असल्याने मुलीचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. दरम्यान, २८ वर्षीय आरोपी प्रियकराने मंगळवारी संध्याकाळी पूर्व बंगळुरूमधील मुरुगेशपल्या येथे तिच्या कार्यालयाबाहेर चाकूने हल्ला करत तिची हत्या केली.