33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयवैद्यकीय कर्मचा-यांना भारतरत्न द्या

वैद्यकीय कर्मचा-यांना भारतरत्न द्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मागील दोन वर्षांपासून भारतासह जगावर कोरोना महामारीचे संकट आहे. या महामारीमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांसाठी देव ठरत आहेत. आपल्या जिवाची बाजी लावून दिवसरात्र आपलं कर्तव्य बजावत आहेत. अशाच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक खास मागणी केली आहे. कोरोना काळात आपली सेवा देणा-या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांना यंदाचा भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. यासाठी हवे तर नियमात बदल करा. अशी सुचनाही केजरीवाल यांनी दिली आहे.

कोरोना महामारीमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना अनेक डॉक्टरांचा प्राणही गेले आहेत. अशा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांचा सन्मान व्हायला हवा, अशी भूमिका केजरीवाल यांनी घेतली आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलेय की, यंदा भारतीय डॉक्टरांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यायला हवे. भारतीय डॉक्टर म्हणजेच, सर्व डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाप होय. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या डॉक्टरांना ही खरी श्रद्धांजली असेल, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांना भारतरत्न दिल्यास संपूर्ण देश खूश होईल.

कोरोनाचा डोळ्यांसह डोकेदुखीची समस्या वाढली

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या