27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयसन्मानजनक मंत्रीपदे द्या; बिहारमध्ये काँग्रेस आमदार आक्रमक

सन्मानजनक मंत्रीपदे द्या; बिहारमध्ये काँग्रेस आमदार आक्रमक

एकमत ऑनलाईन

पाटना : बिहारमध्ये महागठबंधनचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता अंतर्गत कुरघोडी समोर येऊ लागल्या आहेत. नव्या सरकारमध्ये आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्यात, अन्यथा सहन केले जाणार नाही अशी थेट धमकीच काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे. नव्या सरकारची अजून फ्लोअर टेस्ट झाली नाही, तरीही काँग्रेसमध्ये आता मंत्रीपदावरून कुरघोडी सुरू झाल्या आहेत.

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी एनडीएतून बाहेर पडून राजदसोबत घरोबा केला आणि नवीन समिकरण जुळून आलं. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राजदच्या तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारच्या या महागठबंधनमध्ये काँग्रेसलाही सामावून घेतलं जाणार आहे. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरुन जोरदार लढाई सुरू असल्याचं दिसून येतंय. त्यावरुन बिहार काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले असून त्यांनी बिहार प्रभारी भक्त चरण दास यांच्याबद्दल अपशब्दही वापरल्याची माहिती आहे.

मंत्रिपदावरुन काँग्रेसच्या आमदारांनी आतापासूनच आक्रमक भूमिका घेतली असून जर मंत्रिमंडळात सन्मानजनक स्थान मिळालं नाही तर ते सहन केलं जाणार नाही अशी धमकीच दिली आहे. बिहारच्या नव्या सरकारने २४ ऑगस्टला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या सरकारमध्ये २४ आणि २५ ऑगस्टला बिहार विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून २४ ऑगस्टला नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारची फ्लोअर टेस्ट होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या