25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयगुजरातमधील कोरोनाबाधितांची खरी आकडेवारी द्या

गुजरातमधील कोरोनाबाधितांची खरी आकडेवारी द्या

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : गुजरात सरकारकडून कोरोनाविषयक चाचण्या आणि कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत दिला जाणारा तपशील अचूक नसल्याचा समज जनतेत पसरला आहे. तो दूर करण्यासाठी खरी आकडेवारी द्या, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. देशातील बहुतांश राज्यांप्रमाणे गुजरातमधील कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे.

त्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील कोरोना संकट आणि जनतेला भेडसावणा-या समस्यांची दखल घेऊन उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिकेवर सुनावणी सुरू केली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने दिलेला आदेश शुक्रवारी उपलब्ध झाला. त्या आदेशात न्यायालयाने पुन्हा एकदा गुजरातमधील भाजप सरकारला कानपिचक्­या दिल्या. खरी आकडेवारी सादर करण्यास सरकारने टाळाटाळ करू नये. खरे चित्र दडवून सरकारला काहीच मिळणार नाही. उलट खरी आकडेवारी दडवल्याने आणखी गंभीर समस्या निर्माण होतील. जनतेत भीतीचे, अविश्­वासाचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे प्रामाणिक आणि पारदर्शक राहण्याची गरज आहे, असे न्यायालयाने अधोरेखित केले.

गुजरातमध्ये दरदिवशी आढळणा-या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. गुरुवारी ८ हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली. तो त्या राज्यातील दैनंदिन वाढीचा आजवरचा उच्चांक ठरला आहे.

 

लाचखोर दुय्यम निबंधक कार्यालयातील तिघे जेरबंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या