28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय भारतातील फुटीरतावाद्यांना बळ देऊ; चीनची भारताला धमकी ; ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये लेख

भारतातील फुटीरतावाद्यांना बळ देऊ; चीनची भारताला धमकी ; ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये लेख

एकमत ऑनलाईन

बीजिंग:सीमा प्रश्नी भारतासोबत तणाव सुरू असताना आता चीनने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. भारताने तैवान कार्ड खेळणे बंद करावे, अन्यथा चीनदेखील भारतातील काही राज्यांतील फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा देईल, अशी धमकी चीनच्या ग्लोबल टाइम्सने दिली आहे. ईशान्य भारतातील दहशतवादी, फुटीरतावादी चळवळींना चीनकडून शस्त्रे आणि आर्थिक मदत करत असल्याचा दावा याआधी करण्यात आला आहे.

बीजिंग फॉरेन स्टडीज युनिर्व्हसिटीमधील अ‍ॅकेडमी आॅफ रिजनल अ‍ॅण्ड ग्लोबल गर्व्हनन्सचे वरिष्ठ रिसर्च फेलो लाँग शिंगचुन यांनी ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये याबाबत मत मांडले आहे. भारतातील अनेक माध्यमांनी तैवानच्या राष्ट्रीय दिवसाची जाहिरात दाखवली. त्याशिवाय एका वाहिनीने परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांची मुलाखतही दाखवली. यामुळे तैवानच्या फुटीरतावाद्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे आता भारत खेळत असलेल्या तैवान कार्डला प्रत्युत्तर देण्याची चर्चा चीनमध्ये होत आहे, असे शिंगचून यांनी म्हटले आहे.

भारताकडून चीनच्या ‘वन नेशन’ धोरणाला पाठिंबा असून तैवानच्या स्वतंत्र होण्याला पाठिंबा नाही. त्यामुळेच चीनदेखील भारतातील फुटीरतावादी चळवळींना पाठींबा देत नाही. तैवान आणि भारतातील फुटीरतावादी चळवळ ही एकाच श्रेणीतील आहे. भारताने जर तैवान कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. तर, चीनदेखील फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा देऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, भारतीय सैन्याने ते अडीच फ्रंटवर लढाई करण्यास सज्ज असल्याचे म्हटले असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये पाकिस्तान, चीन आणि चीनमधील अंतर्गत विद्रोहाकडे भारताचे लक्ष असल्याचे म्हटले आहे. चीनमधील अंतर्गत विद्रोहात फुटीरतावादी आणि दहशतवादी सहभागी आहेत, असे सांगत भारताने तैवानला पाठिंबा दिल्यास चीनदेखील ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय, मिझोरम, मणिपूर, आसाम आणि नागालँडमधील फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा देऊ शकतो.

ही राज्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संघराज्यात समाविष्ट झाली आहेत. मात्र, यातील अनेकजण स्वत:ला भारतीय समजत नाही, त्यामुळे वेगळ्या देशाची मागणी या ठिकाणच्या फुटीरतावाद्यांकडून करण्यात येते, असे मत ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये मांडण्यात आले आहे. भारतातील या तथाकथित फुटीरतावाद्यांनी चीनकडून भारताविरोधात पाठिंबा मागितल्याचा दावा करीत भारतासोबत असलेल्या मैत्रीमुळे चीनने अद्यापही पाठिंबा दिला नाही. चीन इतर देशांच्या अखंडतेचा सन्मान करतो, अशी फशारकी ‘ग्लोबल टाइम्स’च्या लेखात मारली आहे.

जम्मू-काश्मीर चीनचा भाग दाखल्याने नेटकरी संतप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या