नवी दिल्ली : लडाखमधील गलवान खो-यात चीनबरोबरच्या संघर्षात हुतात्मा झालेले कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्या १९ सहका-यांचा प्रजासत्ताकदिनी मरणोत्तर सन्मान केला जाण्याची शक्यता आहे. कर्नल बाबू यांच्यासह अन्य हुतात्म्यांनी गलवान खो-यातील संघर्षावेळी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांचा सन्मान प्रजासत्ताकदिनी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. लष्कराने यापूर्वीच या हुतात्मांचे स्मारक लडाखमधील पॉइंट १२० येथे उभारले आहे. त्याखेरीज नवी दिल्लीतील युद्धस्मारकावर त्यांचे नाव कोरण्यासाठीचा प्रस्ताव पाठविला आहे.
चिनी लष्कराबरोबर १५ जूनच्या रात्री झालेल्या धुमश्चक्रीत १६ बिहार रेजिमेंटचे कमांंिडग ऑफिसर असलेले कर्नल संतोष बाबू काही सहका-यांसह चिनी लष्कराशी बोलण्यासाठी गेले होते, मात्र चिनी सैनिकांनी अणकुचीदार खिळे लावलेले रॉडने या पथकावर हल्ला चढवला. त्यात वीस जण हुतात्मा झाले. त्यानंतर भारतीय सैन्यानेही चीनला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते़ त्यात किमान ३५ चिनी सैनिक ठार झाले.
नौदलाचा आजपासून सराव
नौदलाच्या वतीने मंगळवारपासून विशेष युद्धसराव करण्यात येणार आहे. संपूर्ण किनारपट्टी आणि भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात अशा या सरावाची व्याप्ती असेल. सी व्हिजिल-२१ नावाचा हा सराव सर्वांत मोठा असून, तो बुधवारी समाप्त होईल. दर दोन वर्षांनी हा सराव केला जातो. प्रामुख्याने गस्ती आणि देशाच्या सागरी सीमांना असणा-या धोक्यापासून बचावाचा सराव, असे याचे स्वरूप असते, असे नौदलाने म्हटले आहे.
यंदाचा अर्थसंकल्प डिजिटल स्वरूपात