30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयगोवा फॉरवर्ड पक्ष रालोआतून बाहेर

गोवा फॉरवर्ड पक्ष रालोआतून बाहेर

एकमत ऑनलाईन

पणजी : भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएला गोव्यातून मोठा धक्का बसला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वात गोवा फॉरवर्डची राज्य कार्यकारिणी बैठक झाली. यामध्ये एनडीएबाहेर पडण्याचा ठराव एकमताने संमत झाला.

गोवा फॉरवर्ड पार्टी (जीएफपी) हा गोव्यातील स्थानिक राजकीय पक्ष आहे. विजय सरदेसाई त्याचे सर्वेसर्वा असून २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने ३ जागांवर विजय मिळवला होता. राज्यात भाजपचे सरकार बनविण्यात सरदेसाई यांचा मोठा पुढाकार होता. त्यामुळे गोवा फॉरवर्ड पार्टीची नाराजी भाजपला महागात पडण्याची शक्यता आहे.

सरकारला धोका नाही
गोवा फॉरवर्ड पार्टीने जरी गोव्यातील भाजप सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी सध्या भाजप सरकारला कसलाही धोका नाही. २०१७ साली विधानसभा निवडणुकीत भाजपचे १३ व काँग्रेसचे १७ आमदार निवडून आले होते. स्पष्ट बहुमत कोणालाच नसताना भाजपने तातडीने हालचाली करीत सर्व छोट्या पक्षांना एकत्र जमवून मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवले होते. त्यानंतर काँग्रेसमधील तब्बल १२ आमदार सावकाश सावकाश फोडत त्यांना २०१९च्या पोटनिवडणुकीत जिंकून आणले होते. त्यामुळे राज्यात सध्या भाजपचे २७ इतके संख्याबळ आहे. बहुमतासाठी २० आमदारांची गरज लागते.

महाराष्ट्रात पुरेशा कोरोना चाचण्या होत नाहीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या