23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयबकरी ईद; केरळ सरकारला ‘सर्वोच्च’ झटका

बकरी ईद; केरळ सरकारला ‘सर्वोच्च’ झटका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बकरी ईदच्या निमित्ताने निर्बंध शिथिल करणा-या केरळ सरकारला सुप्रीम कोर्टाने झटका दिला असून, सुप्रीम कोर्टाने केरळ सरकारला कावड यात्रेसंबंधी दिलेल्या आदेशाचे उदाहरण ठेवत बकरी ईदलाही या नियमांचे पालन करण्याचा आदेश दिला आहे. न्यायमूर्ती रोहिंटन फली नरीमन आणि बी़ आऱ गवई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. कावड यात्रा प्रकरणात आम्ही दिलेल्या आदेशाचे पालन केले जावे असा आदेश आम्ही केरळ सरकारला देत असल्याचे यावेळी खंडपीठाने सांगितले.

केरळ सरकारने यावेळी कोर्टात निर्बंध शिथिल करण्यासाठी लोकांकडून दबाव येत असल्याचा युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने म्हटले, कोणत्याही प्रकारचा दबाव लोकांचा जगण्याचा सर्वात मोठा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. कोणतीही अनुचित घटना घडली तर जनता आमच्या लक्षात आणू शकते आणि त्यानुसार कारवाई केली जाईल.

अपात्र शेतक-यांच्या खात्यातून वसूल करणार किसान योजनेचे पैसे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या