पणजी: बिहार निवडणुकीत बेरोजगारी आणि सरकारी नोकरीच्या मुद्द्यावरून चर्चा रंगली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही आता यात उडी घेतली आहे. देव जरी खाला आणि एका राज्याचा मुख्यमंत्री झाला तर तोही प्रत्येक बेरोजगाराला सरकारी नोकरी देऊ शकत नाही, असे सावंत यांनी शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.
बिहार निवडधुकीत राजदनेते तेजस्वी यादव यांनी राज्यातील तरुणांना १० लाख सरकारी नोक-यांचे आश्वासन दिले आहे. तेजस्वी यादव यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी टीका करीत सर्वांनाच सरकारी नोकरी दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले होते. तोच धागा पकडत प्रमोद सावंत यांनीही सरकारी नोक-यांसंदर्भात भाष्य केले आहे.गोव्यातील ग्रामपंचायत प्रतिनिधींशी संवाद साधताना सावंत यांनी हे वक्तव्य केले. बिहार निवडणुकीत तेजस्वी यादवांनी १० लाख सरकारी नौक-यांचे आश्वासन दिल्यानंतर भाजपाने त्यावर कडी करीत आपल्या जाहिरनाम्यात सरकारी व खासगी क्षेत्रातून १९ लाख नौक-यांचे आश्वासन दिले आहे.
हरियाणामध्येही लवकरच लव्ह जिहाद विरुद्ध कायदा: अनिल विज